
Manoj Jarange । सध्या एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. मराठा समाजाने जरांगे पाटील यांच्या विरोधात आंदोलन छेडल्याची माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांचा पुतळा देखील जाळण्यात आला आहे. यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली असून मराठा आंदोलनात आता मोठा ट्विस्ट आला आहे.
माहितीनुसार, मनोज जरांगे यांच्या विरोधात नागपूर मध्ये आंदोलन करण्यात आले आहे. जरांगे यांचा मराठा समाजाने निषेध करत आंदोलन छेडले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्याचा निषेध करण्यासाठी मराठा समाजाने हे आंदोलन केल्याची माहिती मिळत आहे. नागपूर या ठिकाणी मराठा समाज महाल परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे निषेध आंदोलन करण्यात आले आहे.
Congress । काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! बड्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा
मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत टीका केली. त्याचबरोबर अनेक खोटे गैर कायदेशीर आरोप देखील केले असल्याचा नागपुरातील मराठा समाजाचा आरोप आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या अस्मितेला ठेच पोहचली.. याच्या निषेधार्थ हे आंदोलन केले असल्याचे मराठा बांधवांनी सांगितले आहे.