Site icon e लोकहित | Marathi News

रामदास कदम यांना मोठा धक्का! जवळच्या माणसावर ईडीची मोठी कारवाई

Big shock to Ramdas Kadam! ED big action on near man

रामदास कदम (Ramdas Kadam) यांचा भाऊ सदानंद कदम (Sadananda Kadam) यांच्यावर ईडीने कारवाई केली असून त्यांना ताब्यात घेतले आहे. यामुळे रामदास कदम यांना मोठा धक्का बसल्याचे म्हंटले जात आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! फक्त 1 रुपयांत मिळणार पीकविमा

माहितीनुसार, दापोली येथील साई रिसॉर्टप्रकरणी सदानंद कदम यांच्यावर ईडीने कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. सदानंद कदम यांना घेऊन ईडी मुंबईकडे देखील रवाना झाली आहे.

सुषमा अंधारे यांनी उडवली फडणवीसांच्या अर्थसंकल्पाची खिल्ली; म्हणाल्या…

किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हंटले की, #दापोली #साईरिसॉर्ट घोटाळा #सदानंद कदम यांना अटक (अनिल परबचा साथीदार) क्या होगा तेरा #anilparab असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे. त्यामुळे आता भाऊ सदानंद कदम यांच्या ईडीच्या कारवाईनंतर रामदास कदम काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शरद पवार यांच्या दौऱ्याला लोकांनी केला विरोध, पाहा नेमकं काय म्हणाले?

Spread the love
Exit mobile version