सध्या रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यासाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. त्यांच्या बारामती येथील ॲग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारने साखर कारखान्यांचा हंगाम चालू करण्याची तारीख निश्चित केली होती मात्र तरीदेखील रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कारखान्याने नियोजित वेळेपूर्वी साखरेचा गाळप सुरु केल्याने कारखान्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधार कार्ड संबंधी घेतला मोठा निर्णय!
मंत्री समितीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बारामती ॲग्रो कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे (Baramati Agro Factory Managing Director Subhash Gulve) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
बजरंग दलाने रॅपर एमसी स्टॅनचा कार्यक्रम केला बंद; पाहा VIDEO
बारामती ॲग्रो कारखान्यामध्ये तारखे आधीच गाळप हंगाम सुरु करण्यात आल्याचा दावा भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde) यांनी केला. यानंतर साखर आयुक्तालयांतर्गत विशेष लेखापरीक्षक यांच्यामार्फत या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे बारामती ॲग्रोचे नेते रोहित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय.
अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी केलं मोठं वक्तव्य; म्हणाले…