
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांच्या अत्यंत जवळच्या मानल्या जाणाऱ्या व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर येथील माजी आमदार विनायक पाटील यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने राजकीय वर्तुळात चर्चांना उत आला आहे.
ट्रॅफिक पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, बंद पडलेल्या ट्रकला दिला धक्का; पाहा Video
भिसे महाविद्यालयाचे सभासद राजाभाऊ सुसलादे यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. के. एन. भिसे कला, वाणिज्य आणि विनायकराव पाटील सायन्स या कॉलेजच्या प्राचार्य भरती दरम्यान बनावट कागदपत्रे दिल्याचा आरोप विनायक पाटील ( Vinayak Patil) यांच्यावर करण्यात आला आहे.
अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर इम्पॅक्ट! शासकीय निवासस्थानावरील अतिखर्चिक पाहुनचाराला लावली कात्री
माढा न्यायलयाने ( Madha Court) दिलेल्या आदेशानुसार कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक पाटील यांनी धर्मादाय आयुक्तांच्या न्याय निर्णयाच्या कागदपत्रात बदल करून भिसे महाविद्यालयात प्राचार्य भरती केल्याचे माढा न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
महत्वाची बातमी! पुण्यातील ‘हा’ रोड दोन दिवस असणार बंद
विनायक पाटील यांचे सोलापूरच्या राजकारणात मोठे नाव आहे. राष्ट्रवादीचे( NCP) अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू व निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळख असणारे विनायक पाटील आजपर्यंत दोनदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. या गुन्ह्यामुळे नक्कीच पाटील यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.