
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अगदी महत्त्वाचे नेते पक्ष सोडून जाणार अशी चर्चा मागील काही दिवसांत होत होती. यामध्ये अजित पवार, अमोल कोल्हे यांचा समावेश होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका बड्या व शरद पवारांच्या अगदी जवळच्या नेत्याने पक्षाला राम राम ठोकला आहे.
शरद पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी मजिद मेनन ( Majid Menan) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मेनन यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. आपण आपल्या वैयक्तिक कारणांमुळे पक्ष सोडत आहोत. असे त्यांनी यामध्ये म्हंटले आहे.
आमदार शहाजीबापू यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिहिणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार
या ट्विट मध्ये मजिद मेनन यांनी शरद पवारांबद्दल ( Sharad Pawar) व पक्षाबद्दल कृतज्ञात व्यक्त केली आहे. मला 16 वर्षे सन्मान देऊन मार्गदर्शन केले याबद्दल मी शरद पवारांचा आभारी आहे. काही वैयक्तिक कारणांमुळे मी पक्ष सोडतोय. साहेबांना व पक्षाला शुभेच्छा. असे ट्विट करता मेनन यांनी पक्ष सोडण्याचे कारण देखील सांगितले आहे.
“महिलांनी कपडे नाही घातले तरी सुंदर दिसतात…”, रामदेव बाबांचे वक्तव्य चर्चेत
मजिद मेनन हे राष्ट्रवादी काँगेसमधील ( NCP) महत्त्वाच्या नेत्यांमधील एक होते. ते पेशाने वकील असून 2014 ते 2020 मध्ये खासदार सुद्धा झाले होते. अगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी चांगलीच कामाला लागली आहे. अशातच मेनन यांनी पक्ष सोडल्याने शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे.
मोठी बातमी! 12 डिसेंबर पासून पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरु?