
Sharad Pawar। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केल्यानंतर आपल्याकडे जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे नेते अजित पवार यांच्या गोटात दाखल झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशातच आता अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या वाढतच चालली आहे. (Latest Marathi News)
धक्कादायक! स्कुल बसचा भीषण अपघात; सहा जण जागीच ठार
शपविधीवेळी अजित पवार यांच्याकडे गेलेले अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे (Kiran Lahamte) हे शपविधीनंतर शरद पवार यांच्यासोबत गेले होते. आज ते पुन्हा अजित पवार यांची भेट घेण्यासाठी देवगिरी या शासकीय निवासस्थानी दाखल झालेत. शपथविधीवेळी डॉ. लहामटे यांनी आपली फसवून सही घेतल्याचे सांगितल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर ते शरद पवार यांच्यासोबत दिसले होते.
Rakhi Sawant | ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतने केली टोमॅटोची लागवड, चाहत्यांनाही बसला आश्चर्याचा धक्का
तेव्हापासून त्यांना पुन्हा शरद पवार गटात आणण्याचे प्रयत्न सुरु झाले होते. डॉ. लहामटे परत यावेत त्यासाठी शरद पवारांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते बाळासाहेब जगताप (Balasaheb Jagtap) यांना देण्यात आली होती. जगताप यांनी डॉ. लहामटे यांचे मन वळविण्याचे प्रयत्न केले मात्र ते सहजासहजी तयार होत नव्हते. त्यानंतर आज ते अजित पवार यांच्या भेटीला आले आहेत. त्यामुळे शरद पवार यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
Petrol Diesel Price । पेट्रोल आणि डिझेलचे दर झाले कमी! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
दरम्यान अजित पवार यांच्या बंडामुळे पक्षात (NCP) फूट पडली आहे. दोन्ही गटांकडून आमदार आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच अजित पवार यांनी पक्षावर आणि चिन्हावर दावा केला आहे. आता हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेल्याने राज्याचे राजकारण पुन्हा एकदा चांगलेच ढवळून निघाले आहे. निवडणूक आयोग (Election Commission) कोणत्या गटाला चिन्ह आणि पक्षाचा अधिकार देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.