Sharad Pawar । सोलापूर : २ जुलै रोजी अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) आतापर्यंतचे सर्वात मोठे बंड केले. शिंदे- फडणवीस (Shinde- Fadnavis) सरकारसोबत युती करत त्यांनी आपल्या ८ सहकारी नेत्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली. विरोधी बाकावर बसलेले अजित पवार अचानक सत्तेत सहभागी झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. बंडामुळे पक्षात शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. (Latest Marathi News)
Yuvraj Singh । प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंहच्या आईला धमकी, 40 लाख रुपये द्या नाहीतर… ‘
अजित पवार गटाकडे जास्त आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते असल्याने शरद पवार पुन्हा पक्षबांधणी करत आहेत. अशातच शरद पवार यांना खूप मोठा धक्का बसला आहे. सोलापूर (Solapur) जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे (Baliram Sathe) यांचे सुपुत्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे (Jitendra Sathe) आणि नातू जयदीप साठे (Jaideep Sathe) हे अजित पवार यांच्या गटात सहभागी झाले आहेत.
Kolhapur Flood | ब्रेकिंग! कोल्हापूरमध्ये पूरस्थिती? पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने मोठी वाढ
दरम्यान, बळिराम साठे हे यापूर्वी माजी आमदार राजन पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत होते. परंतु, राजन पाटील यांचा पक्ष प्रवेश लांबला त्यामुळे बळिराम साठे हे राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहिले. पक्षात फूट पडल्यानंतर ते सध्या शरद पवार गटात आहे. परंतु, आता त्यांना घरातूनच मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.