महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भयंकर वेगाने घडामोडी घडत आहेत. महत्त्वाचे राजकीय नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू आहेत. ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे त्याचबरोबर आता राष्ट्रवादीला ( NCP) देखील मोठे खिंडार पडणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा नाशिक दौरा नुकताच पार पडला. या दौऱ्यानंतर नाशिकधील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांचे जवळचे सहकारी व माजी नगराध्यक्ष सुनील मोरे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशा चर्चा नाशिकमध्ये रंगल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा! कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मिळाले घड्याळ चिन्ह
महत्त्वाची बाब म्हणजे सुनील मोरे ( Sunil More) एकटेच पक्षप्रवेश करणार नसून त्यांच्यासोबत शहर विकास आघाडीचे ११ माजी नगरसेवक व शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. सुनील मोरे यांच्या पक्षांतरामुळे नाशिक ग्रामीण मध्ये भाजपला मोठी ताकद मिळणार आहे. ( Nashik)
‘मविआ’च्या उद्याच्या सभेला अजित पवार गैरहजर राहणार? नाराजीच्या चर्चांना पुन्हा उधाण
सुनील मोरे हे छगन भुजबळ यांचे अत्यंत जवळचे व विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. सटाणा शहर विकास आघाडीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी आजपर्यंत पक्षासाठी काम केले आहे. एवढेच नाही तर छगन भुजबळ यांच्या समता परिषदेचे माजी ग्रामीण जिल्हाप्रमुख म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. यामुळे सुनील मोरे यांच्या पक्षांतराने छगन भुजबळ व पर्यायाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे.
या विकेंडला घर बंदूक बिर्याणी पाहा अगदी स्वस्तात; चित्रपटाच्या टीमने दिलीय विशेष ऑफर