
अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी सोबत बंडखोरी केली आणि शिंदे फडणवीस (Shinde Fadnavis) सरकार सोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. काहींनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. तर काहींनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या गटाने आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काही गौप्यस्फोट देखील केले आहेत. (Latest Marathi News)
काल नुकतीच शरद पवार यांनीराष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली होती. यावेळी बैठकीमध्ये खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना निलंबित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र त्यांच्या या निर्णयाला आज अजित पवार गटाने पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिल आहे. अजित पवार यांच्या गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या गटाची भूमिका मांडली आहे.
ठाकरे गटाची गळती सुरूच! नीलम गोऱ्हेंचा शिंदे गटात प्रवेश
याबाबत बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ज्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत त्या पक्षाच्या संविधानाच्यानुसार करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे आम्हाला निलंबित करण्याचा कुणाला अधिकार नाही. याबाबतचा निर्णय आता निवडणूक आयोगच घेईल”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.
सिव्हिल इंजिनियरची नोकरी न करता तरुणाने केली लाल केळीची शेती! आज करतोय लाखोंची उलाढाल