NCP Crisis । शरद पवारांना मोठा धक्का! दोन बडे नेते अजित पवारांच्या गळाला

Big shock to Sharad Pawar! Two big leaders Ajit Pawar's neck

NCP Crisis । अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या काही सहकारी नेत्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) फोडला. त्यांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीला धक्का बसलाच, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनाही खूप मोठा धक्का बसला. शरद पवारांचे जवळचे आणि विश्वासू नेत्यांनी त्यांची साथ सोडली. अशातच अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्हावरही दावा केला आहे. (Maharashtra Politics)

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर यांचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपने मागितली अजित पवार यांची जाहीरपणे माफी

शरद पवारांनी हार न मानता पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. पक्ष फुटून दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला तरीही शरद पवार यांच्या जवळचे नेते अजित पवारांच्या गटात दाखल होत आहेत. अशातच राष्ट्रवादीतील आणखी एका आमदाराने आणि खासदाराने अजित पवार गटाला समर्थन दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (NCP Crisis Latest News) तसेच या दोघांनीही प्रतिज्ञापत्रही अजितदादांकडे दिले असल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

Sukha Duneke killed । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! कॅनडामध्ये पंजाबी गँगस्टर सुखदूल सिंग सुक्खा याची हत्या

नुकतेच शरद पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवा, अशी मागणी अजित पवार गटाकडून याचिका विधिमंडळ कोर्टत केली आहे. त्यानंतर ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे अजित पवार गटाला समर्थन देणारे ते आमदार आणि खासदार कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. शरद पवारांना याचा फटका आगामी निवडणुकीत बसू शकतो.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प बारामती-2 बिट शिर्सुफळ 2 अंतर्गत आज राष्ट्रीय पोषण माह अभियान

Spread the love