Supriya Sule । काही दिवसांपासून राज्यात दररोज आपल्याला नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांनी ८ नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यांच्या या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली आहे. परंतु याचा फटका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना होऊ शकतो. (Latest Marthi News)
मोठी बातमी! कंटनेर आणि एसटीचा भीषण अपघात, महिला प्रवासी गंभीर जखमी
लवकरच लोकसभेच्या निवडणूका पार पडतील. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या (Baramati Lok Sabha Constituency) सुप्रिया सुळे खासदार असल्या तरी आता अजित पवारांच्या बंडामुळे सुप्रिया सुळे यांची खासदारकी धोक्यात येणार की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण बारामती लोकसभेतील सर्व आमदारांचा सुप्रिया सुळेंना खूप विरोध आहे. याचा फटका त्यांना आगामी निवडणुकीत होऊ शकतो.
आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! विधानसभा अध्यक्षांनी बजावली शिंदे गटाच्या 40 आमदारांना नोटीस
दरम्यान, अजित पवार यांनी बंड करत आपल्याकडे पक्षाचे चिन्ह आणि पक्षावर दावा असल्याचे स्पष्ट केलं आहे. तसेच बंड केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक बोलावली होती. सध्या अजित पवार यांच्या पाठीमागे लोकप्रतिनिधींची संख्या शरद पवार यांच्या तुलनेत जास्त आहे. याचा परिणाम दोन्ही गटावर आगामी काळात दिसेल.
हे ही पहा