मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर खरी शिवसेना (Shivsena) कोणाची हा वाद अजूनही मिटला नाही. अशातच दिग्गज राजकीय नेतेमंडळी आणि कार्यकर्ते पक्षांतरण करत आहेत. उद्या शिवसेनेचा वर्धापनदिन आहे. परंतु त्यापूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिशिर शिंदे (Shishir Shinde) यांनी ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनाम्याचं पत्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे सोपवले आहे. या पत्रात शिंदे यांनी राजीनाम्यामागचे खरे कारणही सांगितले आहे.
शिंदे यांनी मनसेची साथ सोडून 19 जून 2018 रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु पक्षात जागा मिळवण्यासाठी त्यांना एकूण चार वर्षे वाट पाहावी लागली होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्याकडे ठाकरे गटाचे उपनेतेपद देण्यात आले होते. 2009 ला भांडुप विधानसभा मतदार संघातून आमदारपदी निवडून आले होते. परंतु 2014 साली पार पडलेल्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला होता.
शिंदेंना मोठा धक्का! शिंदेंच्या निकटवर्तीयाचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश
पक्षात काम करायला मिळत नसल्याची खंत त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे. ‘पक्षात घुसमट होत असून चार वर्षे आपल्याला कोणतीही जबाबदारी दिली नाही, नंतर आपल्याला शोभेचं पद दिले गेले. त्यामुळे आपल्या आयुष्यातील चार वर्षे वाया गेली आहेत. तसेच आपल्या कोणत्याही कृत्यामुळे शिवसेनेची बदनामी किंवा अप्रतिष्ठा झाली नाही असे निश्चयपूर्वक अभिमानाने नमूद करतो,’ असे शिंदे यांनी पत्रात लिहिले आहे.
ब्रेकिंग! भाजप नेत्यांची घरे जाळण्याचा प्रयत्न, कार्यालयांवर हल्ले
दरम्यान वर्धापन दिनाच्या अगोदरच शिशिर शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. याचा परिणाम आगामी निवडणुकांवर दिसून येईल. तसेच शिंदे यांनी राजीनाम्यानंतर आपण कोणत्या पक्षात जाणार हे अजूनही स्पष्ट केले नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची घरासमोरच नेमकी कशी झाली हत्या? अंगावर शहारे आणणारी घटना