Maharashtra politics । उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का! बड्या नेत्याची आज होणार एसीबी चौकशी

Maharashtra politics

Maharashtra politics । रत्नागिरी : पक्ष आणि चिन्ह गेले तरी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणी थांबता थांबत नाहीत. दिवसेंदिवस ठाकरे गटाच्या अडचणीत भर पडत आहेत. तसेच पक्षातील अनेक नेते, पदाधिकारी सत्ताधारी पक्षात सहभागी होत आहेत. याचा फटका ठाकरे गटाला आगामी निवडणुकीत पाहायला मिळेल. अशातच आता ठाकरे गटातील एका बड्या नेत्याची आज लाचलुचपत विभागाकडून चौकशी होणार आहे. (Latest marathi news)

Section 144 In Pune । पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरात लागू केले १४४ कलम, नेमकं प्रकरण काय?

रत्नागिरीचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांची आज चौकशी होणार आहे. दरम्यान, सोमवारी राजन साळवी यांची पत्नी, मुलगा आणि भाऊ यांची चौकशी झाली. असे असताना ता अंतरिम दिलासा देताना हायकोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार, आज राजन साळवी यांची चौकशी होणार आहे. आज दुपारी एक वाजता राजन साळवी रत्नागिरी एसीबी कार्यालयात चौकशीला हजर राहतील.

Samruddhi Mahamarg । समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चालकाचा ताबा सुटल्याने भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी

नेमकं प्रकरण काय?

अवैध मालमत्ता प्रकरणी एसीबीने दिलेल्या तक्रारीनंतर राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल केला असल्याने याप्रकरणी त्यांना एसीबीकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, सोमवारी राजन साळवी यांच्या कुटुंबियांनी एसीबी कार्यालयात हजेरी लावली. आता राजन साळवी यांची चौकशी केली जाणार आहे. तसेच ठाकरे गटाचे माजी खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांचीही आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार आहे.

Ajit Pawar । अजित पवार गटाला भलं मोठं भगदाड; ‘त्या’ 137 पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतली शरद पवारांची भेट

Spread the love