
अनेक अडचणी येऊन देखील ठाकरे गट पक्षबांधणीसाठी जोमाने काम करत आहे. मात्र पक्षाच्या अडचणी संपता संपत नाहियेत. नुकतीच ठाकरे गटातील आमदार व कार्यकर्त्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामुळे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आमदार नितीन देशमुख यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेमधील आमदार व एकूण 125 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
कष्टकरी नवरा बायकोचे स्वप्न झाले साकार; एकाचवेळी दोघेही बनले पोलीस अधिकरी
जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यातील पाणी नागपूर येथे जाऊन देण्यासाठी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून ही संघर्ष यात्रा काढली होती. आमदार नितीन देशमुख ( Nitin Deshmukh) या यात्रेचे नेतृत्व करत होते. जिल्ह्यात जमावबंदी असताना, जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडले म्हणून कुत्र्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल!
अकोला व बाळापूर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ६९ खेडी पाणीपुरवठा योजनेला स्थगिती देण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ अकोला ते नागपूर ( Akola to Nagpur) अशी ही संघर्ष यात्रा काढण्यात आली होती. यामध्ये ६९ खेड्यांमधील ग्रामस्थ व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. मात्र जिल्ह्यात जमावबंदी असताना नागरिक एकत्र आल्याने १२५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
VIDEO: हार्दिक पांड्याचे मैदानातील वर्तन पाहून चाहते नाराज; मैदानावरच केले ‘हे’ धक्कादायक कृत्य