एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली. यांनतर राज्यात नवीन सरकार स्थापन केले. यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले. एकनाथ शिंदे यांनी राज्यात सरकार स्थापन करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर ठाकरे गटाला चांगलीच गळती लागली. ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी शिंदे गटामध्ये त्याचबरोबर काहींनी भाजपमध्ये देखील प्रवेश केला.
बागेश्वर बाबांनी साईबाबांविषयी केले मोठे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, “कोल्ह्याची कातडी घालून कोणी…”
दरम्यान, आता देखील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राम गावडे यांनी उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे समजले जात आहे.
सर्वात मोठी बातमी! ‘या’ भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या
राम गावडे यांच्यासोबत त्यांचे समर्थक, त्याचबरोबर गावोगावचे सरपंच-उपसरपंच देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश मुंबई या ठिकाणी होणार आहे. येत्या 5 तारखेला हा पक्षप्रवेश होणार आहे. याबात माहिती राम गावडे यांनी दिली आहे.
खळबळजनक! पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला, जागीच झाला मृत्यू