
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आणि भाजपसोबत युती करून राज्यात नवीन सरकार स्थापन केले. नंतर ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले. यांनतर ठाकरे गटाला चांगलीच गळती लागली. अनेक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. दरम्यान, उद्धव ठाकरे गटातील कल्याण शहर उपजिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी काल असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे.
“काहीही झालं तरी राजकीय भूकंप होणारच” अंबादास दानवे यांचे वक्तव्य चर्चेत
याबाबत एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. ट्विट करत ते म्हणाले, “अरविंद मोरे यांचा अनुभव आणि त्यांचे पक्षातील योगदानाचा विचार करून त्यांची शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख पदी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबतचे पत्र त्यांना सुपूर्द करण्यात आले.”
पुणे विद्यापीठातील रॅपसाँग प्रकरणी अजित पवार यांनी व्यक्त केला संताप; म्हणाले…
त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, “यावेळी उद्धव ठाकरे गटातील उप जिल्हाप्रमुख राजू कपोते, प्राध्यापक जितेंद्र भामरे तसेच विभागप्रमुख, शाखाप्रमुख, युवासेना प्रतिनिधी आणि महिला आघाडी प्रतिनिधींनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या.”
ब्रेकिंग! कांदा अनुदानाच्या अर्जासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज