एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी शिवसेनेतील 40 आमदारांना फोडून राज्यात राजकीय भूकंप आणला होता. यावेळी त्यांनी गुवाहाटी मधील कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. इतकेच नाही तर यावेळी त्यांनी कामाख्या देवीला नवस देखील केला होता. यानंतर ते महाराष्ट्रात आले आणि राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले. यानंतर एकनाथ शिंदे पुन्हा एकदा कामाख्या देवीच्या दर्शनाला जायला निघालेत. यावेळी त्याच्यासोबत शिंदे कुटुंब व शिंदे गटातील आमदार असणार आहेत. यावेळी कामाख्या देवीचा नवस फेडण्यासाठी ते गुवाहाटी वारी करत आहेत.
५० गावकऱ्यांना जखमी केलेलं माकड अखेर जेरबंद
या पार्श्वभूमीवर राज्यात चर्चांना उत आलाय. दर्शनाला जात असताना शिंदे गटातील बड्या नेत्यांनी काही दावे केले आहेत. ज्यामुळे उद्धव ठाकरेंच टेन्शन वाढलंय. उदय सामंत ( Uday Samant) यांनी ” गुवाहाटी ला निघण्यापूर्वी येताना आमच्यासोबत जास्त लोक असतील” असे सांगितले आहे. यामुळे ठाकरे गटातील आणखी नेते फुटणार का ? या शक्यतेने उद्धव ठाकरे यांचा ताण वाढत आहे. ” मध्यावधी निवडणुका लागण्याचा प्रश्नच येणार नाही. काही लोकांना भीती वाटते की आपल्याकडचे लोक इकडे-तिकडे जातील की काय! त्यामुळे त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी हे सगळं चाललंय, असं उदय सामंत म्हणाले आहेत.
आजपासून बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालकांचे आंदोलन
तसेच नाशिक महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गुवाहाटी वरून परतल्यानंतर मोठा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. यामध्ये ठाकरे गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. यामुळे दिवसेंदिवस ठाकरे गटाला लागलेली गळती हा चर्चेचा मुद्दा बनला आहे.
स्वप्निल जोशी- शिल्पा तुळसकरचा बेडरूममधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल! पाहा VIDEO