मागील काही दिवसांपासूम इलॉन मस्क ने ट्विटर मधील कर्मचाऱ्यांना अचानक कंपनीतून काढून टाकल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर आता फेसबुकची मूळ कंपनी मेटा इंकने देखील कर्मचाऱ्यांना कामावरून काढणे सुरू केले आहे. फेसबुकमध्ये एकूण 87000 कर्मचारी काम करतात यातील सुमारे 13 टक्के कर्मचाऱ्यांना आतापर्यंत काढून टाकण्यात आले आहे. यामुळे फेसबुक व इतर मेटा कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगलाच ताण आला आहे.
युवा शेतकऱ्यांचा स्वस्तात मस्त फंडा; मिरचीच्या किडीवर शोधला ‘हा’ उपाय
फक्त मेटाच ( Meta) नाही तर इतर कंपन्यांमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. भारतातील ट्विटरच्या निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांना इलॉन मस्क यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यासोबतच पेमेंट प्रोसेसिंग फर्मने 14 टक्के लोकांना कामावरून काढले आहे तर रायडशेअर कंपनी LYFT ने 13 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. ऍमेझॉन (Amazon) आणि गूगल ( Google) या कंपनीसुद्धा सध्या याच मार्गावर आहेत.
या सर्व गोष्टींमुळे मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांवर कंपनीतून बाहेर हाकलले जाण्याची टांगती तलवार आहे. नोकरी मिळवण्यासाठी लोक जीवाचे रान करतात. अशातच एका चांगल्या कंपनीतील चांगल्या पगाराची नोकरी सुटल्याने हे कर्मचारी चांगलेच चिंतेत आहेत.