भारत जोडो यात्रेच्या दणदणीत यशानंतर काँग्रेसचे 85 अधिवेशन सुरू झाले आहे. छत्तीसगड राज्यात हे अधिवेशन सुरू असून यासाठी देशभरातील काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित आहेत. या अधिवेशनात सोनिया गांधी यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. यावेळी त्या म्हणाल्या की, ” भारतात आजपर्यंत काँग्रेसने लोकशाही मजबूत केली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतून लोकशाहीची मूल्ये जपण्यास मोठी मदत झाली. मात्र भारत जोडो यात्रा हाच माझ्या राजकीय जीवनातील अखेरचा टप्पा असू शकतो.”
पुण्यात जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी हटके संकल्पना; मतदान करणाऱ्यांना मोफत चहा व पुस्तक वाटप
यांनतर सोनिया गांधी खरंच राजकारणातून निवृत्त होणार का? अशा चर्चांना उधाण आले होते. दरम्यान आता याबाबत काँग्रेसच्या प्रवक्त्या अल्का लांबा यांनी माहिती दिली आहे. सोनिया गांधी राजकारणातून निवृत्त होणार नसल्याचे अल्का लांबा म्हणाल्या आहेत.
एसी खरेदी करताना ‘या’ ५ गोष्टींचा विचार करा, नाहीतर होईल पच्छाताप
दरम्यान, अधिवेशनावेळी सोनिया गांधी यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होणाऱ्या लोकांचे, कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे व नेत्यांचे आभार मानले. तसेच राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांच्या समर्पण व निष्ठेमुळे भारत जोडो यात्रा यशस्वी झाली. असे म्हणत राहुल गांधींचे कौतुक सुद्धा केले.
शेतकरी कुटुंबातील मुलीची कमाल! अभ्यास सांभाळत करते 20 एकर शेती; कमावते मोठे आर्थिक उत्पन्न