Site icon e लोकहित | Marathi News

भाजपला पुन्हा मोठे खिंडार! चार माजी नगरसेवक आणि 500 कार्यकर्त्यांनी केला बीआरएसमध्ये प्रवेश

bjp

राज्यात मागील काही दिवसांपासून नाटयमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. मागील वर्षी शिवसेनेमध्ये (Shivsena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करून भाजपसोबत (BJP) युती केली. काही दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) बंड करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. याचे तीव्र पडसाद राज्यभरात पाहायला मिळत आहेत. अशातच आता भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. (Latest Marathi News)

Gautami Patil । गौतमीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! ‘घुंगरू’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ढकलली पुढे; कारण…

सोलापूरमध्ये भाजपच्या 4 माजी नगरसेवकांनी आणि एका बड्या शिक्षण संस्थेच्या सचिवासह 500 कार्यकर्त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांच्या उपस्थितीत बीआरएस (BRS) पक्षात प्रवेश केला आहे. यामध्ये नागेश वल्याळ, राजश्री चव्हाण, संतोष भोसले आणि जुगनबाई आंबेवाले या चार माजी नगरसेवकांचा समावेश आहे. त्यांनी पक्ष प्रवेशासाठी शंभरपेक्षा जास्त वाहने घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन करत हैदराबाद गाठले आणि केसीआर यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.

NCP Crisis । शरद पवार यांना मोठा झटका, कारमधून प्रवास करणारा आमदार अजित पवारांच्या गोटात

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. राज्यात लवकरच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. जर राज्यातील पक्षांना अशीच गळती लागली तर त्यांना याचा आगामी निवडणुकीत खूप मोठा फटका बसू शकतो.

दिल्लीत मुसळधार पाऊस, पावसाने तोडले 20 वर्षांचे रेकॉर्ड, IMD ने जारी केला यलो अलर्ट

Spread the love
Exit mobile version