Crime News । ठाणे : मीरा रोड येथील सरस्वती वैद्य हत्याकांड (Saraswati Vaidya) प्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरले होते. आरोपी मनोज साने याने विष पाजून त्याची ‘लिव्ह इन पार्टनर’ सरस्वती वैद्यची हत्या करून करवतीने तिच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे करून कुकरमध्ये शिजवले होते. शेजाऱ्यांना दुर्गंधी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. (Meera Road Murder Case)
Asia Cup 2023 । पावसामुळे आशिया चषकाची फायनल रद्द झाली तर विजेता कोण? काय सांगतो नियम जाणून घ्या…
सरस्वती वैद्य हत्याकांड प्रकरणी नया नगर पोलिसांकडून ठाणे सत्र न्यायालयामध्ये तब्बल १२०० पानांचे दोषारोपत्र सादर करण्यात आले आहे. पोलिसांनी याच एकूण ६२ साक्षीदार तपासले आहेत. त्यात शेजाऱ्यांपासून न्यायवैद्यक कर्मचाऱ्यांचे तसेच विष, कटर, प्लास्टिक ज्या दुकानातून घेतले त्या दुकानदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. मनोज सानेचे ६ महिन्यांपासून सरस्वती वैद्य सोबत भांडण सुरू होते. (Latest Marathi News)
Buldhana News । दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट; बुलढाण्यामध्ये चिमुकलीचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?
त्यामुळे त्याने सरस्वतीला मारण्याचा प्लॅन बनवला होता. त्याने तिला ताकामधून विष देऊन तिच्या मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट लावली असे या दोषारोपत्रात म्हटलेले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर साने याने मृतदेहासोबत ३५ छायाचित्रे काढली होती. त्याचा फोन न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवून पोलिसांना ती छायाचित्रे पुन्हा मिळवण्यात यश आले आहे.
Havaman Andaj । राज्यात पावसाचे दमदार आगमन! ‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस