Kirit Somaiya । मुंबई : काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ (Kirit Somaiya Viral Video) समोर आला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी हा मुद्दा सभागृहात मांडत सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी व्हिडीओ क्लिप्स असणारा पेनड्राईव्ह सभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्याकडे सुपूर्द केला होता. याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली होती.
Havaman Andaj । आनंदाची बातमी! पुन्हा मान्सून सक्रीय होणार; जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
गुन्हे शाखेने तपासादरम्यान हा व्हिडिओ खरा असल्याचा दावा केला आहे. या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड किंवा मॉर्फ केले नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) खाजगी वृत्तवाहिनी आणि अनिल थत्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून भारतीय दंड संहितेच्या कलम 500 (मानहानी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (ई) आणि 67 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
सोमय्या यांचा मंगळवारी पोलिसांनी जबाब नोंदवला होता. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने संपूर्ण व्हिडिओचे बारकाईने विश्लेषण करून हा व्हिडीओ कोणी आणि कोणत्या उद्देशाने व्हायरल केला याचा तपास करण्यात आला आहे. परंतु, कारवाईमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अधिक तपास मुंबई पोलिसांकडून केला जात आहे.
Sharad Pawar । “भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग होतोय” शरद पवारांचा गंभीर आरोप