मान्सूनचे केरळमध्ये (Arrival of Monsoon in Kerala) आगमन झाले आहे. भारतीय हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) ही घोषणा करण्यात आलेली आहे. केरळमध्ये पाऊस दाखल झाल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यामुळे आता महाराष्ट्रात देखील लवकरच मान्सूनचे आगमन होणार अशी आशा लोकांना लागून राहिली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात पोहचण्याची शक्यता आहे. त्यांनतर मान्सून पश्चिम बंगालपासून बिहारच्या दिशेने सरकेल. १५ जूनपर्यंत पाऊस गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि बिहारमध्ये पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Accident | आरोग्य शिबिराहून परतताना डॉक्टरांच्या गाडीचा भीषण अपघात; २ जण जागीच ठार
यावर्षी जवळपास एका आठवडा उशिरा केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. लवकरात लवकर राज्यात देखील पावसाचं आगमन होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यावर्षी प्रचंड उन्हाळ्याची झळ लोकांना सोसावी लागली. मान्सून देखील यावर्षी उशिराने दाखल झाला आहे. परंतु आता केरळमध्ये मान्सूनचं आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांच्याच चिंतेला पूर्णविराम लागला आहे. केरळमधील बऱ्याच भागांमध्ये पाऊस झाला आहे.
सर्वात मोठी बातमी! शरद पवारांना धमकी देणारा चंद्रशेकर बावनकुळेंसोबत केक कापतोय; फोटो व्हायरल