Bigg Boss 17 । बिग बॉस 17 चा विजेता होणार मालामाल, ट्रॉफी, रोख रक्कमेसह मिळणार ‘हे’ शानदार गिफ्ट

Bigg Boss 17

Bigg Boss 17 । अभिनेता सलमान खान (Salman Khan) होस्टेड बिग बॉस 17 हा रिऍलिटी शो सध्या तुफान चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो म्हणून या शो (Bigg Boss) ची ओळख आहे. हा शो सध्या अंतिम टप्प्यात असून लवकरच तो संपणार आहे. त्यामुळे या शो चा विजेता कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विजेता होण्यासाठी प्रत्येक स्पर्धक खूप मेहनत करताना दिसत आहे. (Latest marathi news)

Pune Crime । देवदर्शनाला पत्नीला घेऊन गेला अन् २५० फूट खोल दरीत फेकलं; भयानक घटनेने पुणे हादरलं

विजेत्या (Bigg Boss 17 Winner) स्पर्धकाला धमाकेदार गिफ्ट मिळणार आहेत. यात ट्रॉफी, आलिशान कार आणि 50 लाख रुपयांची रोख रक्कमेचा समावेश आहे. दरम्यान, ‘बिग बॉस 17’ या शो चा विजेता कोण? यावरून सध्या अनेक तर्कविर्तक लावण्यात येत आहेत. अशातच या कार्यक्रमासंदर्भात नवनवीन अपडेट समोर येत आहेत. पुढील दोन आठवड्यात या पर्वाचा विजेता कोण? हे आपल्याला समजेलच.

Deepika Padukone । मोठी बातमी! अभिनेत्री दीपिका पादुकोणची तब्येत बिघडली; चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण

‘बिग बॉस 17’ या शो मध्ये एकूण 17 स्पर्धकांनी सहाभागी घेतला होता. त्यापैकी मुनव्वर फारुकी, आयशा खान, अंकिता लोखंडे, विकी जैन, औरा, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट,अभिषेक कुमार, अनुराग डोभाल, ईशा मालवीय, मनारा चोप्रा, समर्थ जुरेल, रिंकू धवन आणि अरुण माशेट्टी ए स्पर्धक उरले आहेत. त्यापैकी विजेता कोण? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Mumbai Fire Video । ब्रेकिंग न्यूज! शाळेला भीषण आग; सगळीकडे धावपळ सुरु

Spread the love