Site icon e लोकहित | Marathi News

Maharashtra Politics । राजकीय वर्तुळातून मोठी बातमी! बारामतीत शिवसेनेचा बडा नेता देणार अजितदादांना सर्वात मोठा धक्का

Maharashtra Politics

Maharashtra Politics । राज्याचे राजकारण दिवसेंदिवस वेगळे वळण घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. सर्व पक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission) कधीही निवडणुका जाहीर करू शकते. यंदाच्या निवडणुकीवर सर्वांचे विशेष लक्ष असणार आहे. (Latest marathi news)

Police Recruitment । खुशखबर! राज्यात होणार तब्बल १६ हजार जागांवर पोलिसांची भरती

अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना बारामतीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivatare) हे अजितदादांना बारामतीत मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. “विधानसभेच्या जागा ठरवल्याशिवाय लोकसभेचे काम नाही करणार नाही. जरी नेत्यांनी सांगितले तरी काम कोण करणार नाही”, असा इशारा विजय शिवतारे यांनी दिला आहे.

Maharashtra politics । सर्वात मोठी बातमी! भाजपच्या मंत्र्यावर मारहाणीचा आरोप, भाजप पदाधिकाऱ्यानेच तक्रार दिल्याने खळबळ

मी सध्या सबुरीची भुमिका घेतली आहे. ज्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबतीत स्पष्ट करतील, तेव्हा निश्चितपणे यातून मार्ग निघेल, असे शिवतारे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, सध्या जागावाटपावरून रस्सीखेच सुरु असून तिन्ही पक्षांचे नेते आपलाच दावा सांगत आहेत. शिवतारे हे पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून येतात.

Lok Sabha Elections । भाजपला मोठा धक्का! निवडणुकीपूर्वी माजी खेळाडूने ठोकला राजकारणाला राम राम

Spread the love
Exit mobile version