राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस (Davendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी एका डिझायनर विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली होती. डिझायनर महिलेने अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी अमृता फडणवीस यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
कृष्णापुर ते ढाणकी नाला रुंदीकरण व खोलीकरण प्रशासनाकडे वारंवार निवेदन करूनही अद्याप मंजूर केले नाही!
अनिक्षा या डिझायनरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणी अनिक्षाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर वडील बुकी अनिल जससिंघानी यांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत. माहितीनुसार, अनिक्षाला उल्साहनगर येथील घरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Video: “नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदे अॅक्शन मोडमध्ये तर…”, घर बंदूक बिरयानी’ चा ट्रेलर पाहिला का?
दरम्यान, डिझायनर अनिक्षा हिने एका फौजदारी खटल्यात हस्तक्षेप करण्यासाठी अमृता फडणवीस यांना 1 कोटी रुपयांची लाच ऑफर केली होती. ही डिझायनर महिला अमृता फडणवीस यांना सतत फोनवर मेसेज आणि कॉल्स करत यामुळे अमृता फडणवीस यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
सगळं ठरलंय! लोकसभा 2024 च्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सज्ज