Site icon e लोकहित | Marathi News

आत्ताची सर्वात मोठी बातमी! बच्चू कडू यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवले

Biggest news ever! Bachu Kadu was shifted to Nagpur for further treatment

रास्ता ओलांडताना आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचा अपघात झाला होता. हा अपघात अमरावतीमध्ये झाला आहे. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना अमरावतीच्या खासगी रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या तब्येतीबाबत स्वतः बच्चू कडू यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

स्वारद फाउंडेशन आयोजित उद्योजकता मार्गदर्शन मेळावा आणि रक्तदान शिबिर उत्साहात पार!

बच्चू कडू यांनी ट्विट करत लिहिले की, “आज सकाळी रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती ठीक असुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया सर्व हितचिंतकांना विनंती की कोणीही भेटायला येऊ नये”.

अपघातांनंतर बच्चू कडू यांची कार्यकर्त्यांना विनंती; म्हणाले, “सर्वाना विनंती की कोणीही…”

मात्र, आज सकाळी प्राथमिक उपचार झाल्यानंतर बच्चू कडू यांना पुढील उपचारासाठी अमरावतीवरून नागपूरच्या न्यूरॉन हॉस्पिटलला रवाना केले आहे. यावेळी बच्चू कडू यांच्यासोबत सोबत पत्नी नयना कडू देखील होत्या.

कार्यकर्त्यांनी घातला तुफान राडा; स्वतः गौतमी पाटीलनेच थांबवला कार्यक्रम

Spread the love
Exit mobile version