Site icon e लोकहित | Marathi News

आत्ताची सर्वात मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

Biggest news ever! Death threat to Union Minister Nitin Gadkari again

मागच्या काही दिवसापुर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा त्याच्या कार्यालयात धमकीचा फोन (Threatening Phone Call) आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. फोन कारण्याऱ्याने मला नितीन गडकरी यांच्याशी बोलायचं आहे असं सांगत धमकी दिली आहे.

ब्रेकिंग! उर्फी जावेदच्या अतरंगी कपड्यांविरोधात महिलांनी काढला मोर्चा, केली ‘ही’ मोठी मागणी

आता याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. गडकरी यांच्या कार्यालयातून दिल्ली पोलिसांना (Delhi Police) याबाबत माहिती देण्यात आली आहे. नितीन गडकरी यांना फोन येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील दोन वेळा नितीन गडकरी यांना धमकीचे फोन आले होते.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला धडाकेबाज निर्णय; वाचा सविस्तर

माहितीनुसार, काल संध्याकाळी गडकरी यांच्या कार्यालयात एक फोन आला असून हा फोन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी उचलला. त्यावेळी फोन कारण्याऱ्याने मला नितीन गडकरी यांच्याशी बोलायचं आहे असे सांगितले. यावर कर्मचाऱ्यांनी गडकरी व्यस्त आहेत त्यामुळे ते फोनवर बोलू शकत नाहीत असं सांगितलं यावेळी त्या व्यक्तीने धमकी दिली. आता या व्यक्तीचा तपास पोलीस करत आहेत.

लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाच्या किती जागा? महाविकास आघाडीचा नवीन फॉर्म्युला काय? जाणून घ्या…

Spread the love
Exit mobile version