मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्क येथे काल ( ता.3) मारहाण झाली होती. तीन ते चार जणांनी देशपांडे यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे व खा. संजय राऊत ( Sanjay Raut) यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यानंतर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या हल्ला प्रकरणात थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याची पोलिसांकडून चौकशी सुरू; घटनेचे CCTV फुटेज देखील आले समोर
सुषमा अंधारे यांची बडनेरा येथे सभा होती. या सभेमध्ये या सभेमध्ये बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, देशपांडे यांच्यावर असा हल्ला झाला असेल तर खरंच निषेधच आहे. मात्र काल कसबा निवडणुकीचा निकाल लागला यामध्ये भाजपचा पराभव झाला त्यामुळे पराभवाची चर्चा होत असल्याने देवेंद्रजी यांनी चर्चा दुसरीकडे वळवण्यासाठी तर हे केलं नाही ना, असं अंधारे यांनी यावेळी म्हंटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
“माझा टीशर्ट ४५ हजार रुपयांचा….” कपडे, दागिने, बूट याबद्दल एमसी स्टॅनने केला मोठा खुलासा
दरम्यान या हल्ल्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली असून मारहाणीचा व्हिडीओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या हल्ल्यांची गांभीर्याने दाखल घेतली असून त्यांनी संदीप देशपांडे यांची चौकशी करत आरोपींना लवकरात लवकर कठोर शासन करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. दरम्यान मुंबई पोलिसांकडून या हल्ल्याची अगदी कसून चौकशी सुरू आहे.
मोठी बातमी! संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार नाराज
खरंतर संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर कोण आहेत? या हल्ल्यामागील त्यांचा नेमका हेतू काय? या गोष्टींचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. तसेच या घटनेतील संशयित आरोपी व संदीप देशपांडे यांनी आरोपींचे केलेले वर्णन याआधारे पोलिसांनी तपास सुरु केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हल्ला करत असताना हल्लेखोरांनी वरून सरदेसाई व ठाकरे या नावाचा उल्लेख केला असल्याचे सांगितले जात आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील जेठालालच्या जीवाला धोका; 25 लोक हत्यारे घेऊन घराबाहेर