पुण्यामध्ये कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या मृत्यूनंतर कसबा पोटनिवडणुक जाहीर झाली. ( Kasba Assembly Elections 2023) ही निवडणूक बिनविरोध होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र या निवडणुकीत चुरशीचा सामना रंगणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश
त्यामुळे आता दोन्ही मतदारसंघातून कोण विजयी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यामध्येच आता ॲड. असीम सरोदे यांनी एक मोठं विधान केलं आहे. कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक रद्द होऊ शकते, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.
Gautam Adani: उद्योगपती गौतम अदानी यांना अजून एक मोठा धक्का!
जर 16 आमदार अपात्र ठरले तर राज्य सरकारच बरखास्त होईल. त्यामुळे निवडणूक घेण्याचा प्रश्न येणार नसल्याचं असीम सरोदे यांनी म्हटलं आहे. सध्या त्यांच्या वक्तव्याची सगळीकडे जोरदार चर्चा चालू आहे. माध्यमाशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
एका जागेसाठी 21 उमेदवार! कसबा विधानसभा पोटनिवडणुकी कोण कोण उतरलंय मैदानात? वाचा सविस्तर