
मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. प्रिया बेर्डे यांनी ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. दरम्यान, आता प्रिया बेर्डे यांनी काॅंग्रेसला (Congress) रामराम ठोकला आहे. प्रिया यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत 7 जुलै 2020 मध्ये काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
कोयता गॅंगनंतर आता तलवार गॅंग घालतेय धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
प्रिया बेर्डे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. प्रिया यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. अवघ्या 2 वर्षात प्रिया यांनी काॅंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.
ब्रेकिंग! देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांचा एकाच गाडीतून प्रवास
राष्ट्रवादीची साथ सोडून प्रिया बेर्डे यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. त्यांच्याबरोबर अनेक कलाकारांनी देखील पक्षप्रवेश केला आहे. नाशिकमध्ये भाजप कार्यकारणीच्या कार्यक्रम आयोजीत हा प्रक्षप्रवेश करण्यात आला. त्याचवेळी गिरीश परदेशी, दिग्दर्शक मधुरा जोशी, विद्या पोकळे, मनिषा मुंडे, वेदांत महाजन, दत्तात्रय जाधव यांनी पक्ष प्रवेश केला.
सामान्यांना चटका तर शेतकऱ्यांना दिलासा! गोकूळ डेअरीच्या दुधात ‘इतक्या’ रुपयांची वाढ
दरम्यान, मराठी चित्रपट सृष्टी गाजणारे सुप्रसिद्ध नाव म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे होय. अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या प्रिया बेर्डे या पत्नी आहेत. प्रिया यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘बेटा’, ‘हम आपके है कौन’ या हिंदी चित्रपटांतही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. कोरोना काळात प्रिय बेर्डे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
“आदित्य ठाकरे यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करा”, तानाजी सावंत यांचं मोठं विधान