सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील शेवगाव (Shevgaon) तालुक्यातील गंगामाई कारखान्यात (Gangamai Factory) भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटामुळे कारखान्याला भीषण आग लागली आहे.
“अजित पवारांचे पुण्यात येऊन बारा वाजवीन”, नारायण राणेंचा गंभीर इशारा
माहितीनुसार, इथेनॉलच्या टाकीला आग लागल्याने हा स्फोट झाला आहे. ही घटना सायंकाळच्या सुमारास घडली असून या ठिकाणी दर पाच मिनिटाला स्फोट होत आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या (Fire engines at the scene) दाखल झाल्या आहेत.
अभिजित बिचुकले यांनी केली मोठी मागणी; म्हणाले, “कसबा पोटनिवडणूक रद्द करा”
कामगार नेहमीप्रमाणे काम करत असताना कारखान्यात स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेमध्ये अनेकजणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर या कारखान्यातील रसाच्या टाक्या देखील फुटल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
सलमान खानला पाहताच नेटकरी म्हणाले, “आमचा हिरो आता म्हतारा दिसू लागलाय”