
शिवसेना नक्की कोणाची? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याबाबत याबाबत आजपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरु झाली आहे. ही सुनावणी पुढील तीन दिवस आहे. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल जोरदार युक्तिवाद केला आहे.
‘या’ देशात सर्वात जास्त प्रमाणात कंडोम वापरले जाते; भारतात सुद्धा आहे मोठी बाजारपेठ
नोव्हेंबर 2019 मधला ‘तो’ पहाटेचा शपथविधी! त्या शपथविधीने राजकीय वर्तुळात उडालेली खळबळ. त्यानंतर भाजपला बसलेला धक्का आणि महाराष्ट्रात स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार. हा पहाटेचा शपथविधी मागच्या काही दिवसापासून चर्चेत आहे. मात्र आज देखील तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख केला आहे.
“…म्हणून भगतसिंह कोश्यारींनी राज्यपालपद सोडले”; वाचा मोठा खुलासा
कपिल सिब्बल म्हणाले, महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी भगतसिंग कोश्यारी हे होते. त्यावेळी त्यांनी बहुमत आहे की नाही? हे न पाहताच त्यांनी सरकार स्थापन करण्यासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना कसं काय निमंत्रण दिलं? असा सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर त्यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा हेतू माहित असल्यानेच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडलं.”
आदिल खानविरोधात लढण्यासाठी राखी सावंतला दिला ‘या’ राजकीय पक्षाने पाठिंबा