
शिंदे गट आणि ठाकरे गटातील सत्तासंघर्षाचा निकाल ( Sttasanghrsh Result) आज लागणार आहे. या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. या निकालाने महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलणार आहेत. यामुळे त्याला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.
जर 16 आमदार अपात्र ठरले तर मुख्यमंत्री अपात्र ठरतील. हे 16 आमदार अपात्र ठरणार असतील तर उरलेले 24 आमदार देखील अपात्र ठरतील. त्यामुळे हे सरकार काही क्षणातच कोसळेल. हे सरकार जाईल, असा मोठा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
मोठी बातमी! Gmail वापरण्यासाठी आता द्यावे लागणार पैसे! लवकरच सुरू होणार पेड सर्व्हिस
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना हा मोठा दावा केला आहे. त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालय काय निकाल देईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
पुणे लोकसभा पोटनिवडणूकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला! ‘या’ नेत्याला मिळणार संधी…