एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील अलका टॉकीज या भागात आज आंदोलनाला सुरवात केली होती. एमपीएससीच्या नवीन अभ्यासक्रमावरून विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. नवीन अभ्यासक्रम २०२३ पासून लागू न करता २०२५ पासून लागू करावा. अशी विद्यार्थ्यांची मागणी होती.
आता MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. नवीन अभ्यासक्रम २०२३ पासून लागू न करता २०२५ पासून लागू करावा विद्यार्थ्यांची ही मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. सरकारने MPSC चा नवा अभ्यासक्रम २०२५ सालापासून लागू करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अरे बापरे! भारत जोडो यात्रेत राहुल गांधी चालले ‘तब्बल’ इतके किलोमीटर
या आंदोलनामध्ये गोपीचंद पडळकर यांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शविला होता. दरम्यान, सरकारच्या या निर्णयावर विद्यार्थ्यांकडून आनंदोत्सव साजरा केला जातोय. पुण्यायामध्ये विद्यार्थ्यांनी गोपीचंद पडळकर यांना उचलून घेत त्यांच्या नावाचा जयजयकार केला आहे.
पुणेरी रिलस्टार अथर्व सुदामे अडकला लग्नबंधनात; सेलेब्रिटींनीही दिल्या शुभेच्छा!