राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Aavhad) यांच्याबाबत एक ऑडिओ क्लिप नुकतीच व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या कुटुंबातील व्यक्तींना जीवे मारण्याबाबत संभाषण आहे. यामध्ये एक व्यक्ती बोलत असून ती जितेंद्र आव्हाड यांची मुलगी आणि जावयाला मारण्याचा कट आखत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही धक्कादायक क्लिप ऐकून देखील जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल न करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय खेळाडू फीट राहण्यासाठी इंजेक्शन घेतात? निवड समितीच्या अध्यक्षांनी केले धक्कादायक खुलासे
याबाबत माहिती देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत की, “व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये बोलणाऱ्या व्यक्तिचे नाव महेश असे आहे. माझ्या मुलीला शूटर लावून शूट करुन टाकायचं. तसेच जावयाला देखील त्याच्या घराजवळ मारायचं किंवा त्याला भीती बसेल असे काहीतरी करायचं, याबद्दल या क्लिपमध्ये बोलले गेले आहे. या कामासाठी त्या व्यक्तीला ५० लाख मिळणार असून त्यातील वीस लाख वाटण्यात जाणार असल्याचे ती व्यक्ती सांगत आहे.”
कसबा, चिंचवड पोटनिवडणुक; मनसेचा भाजपला पाठिंबा जाहीर
या क्लिपमध्ये बोलणाऱ्या व्यक्तीने ‘मी बाबाजींच्या जीवावर काम करत आलो आहे’ असा उल्लेख देखील केला आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड याबाबत पोलीस तक्रार करणार नाहीत. पोलीस तक्रार ( Police Case) करून काही होत नाही. चौकशीच्या नावावर पोलीस काही करत नाहीत आणि आरोपी फिरत असतो. यामुळे मला पोलीस तक्रार करायची नाही अशी भूमिका आव्हाड यांनी मांडली आहे.
प्रेयसीची हत्या करून त्याच दिवशी दुसऱ्या मुलीशी केले लग्न; दिल्लीमध्ये पुन्हा एकदा हत्याकांड