Site icon e लोकहित | Marathi News

आत्ताची सर्वात मोठी बातमी! राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा; मोदींवर टीका करणे पडले महागात

Biggest news ever! Rahul Gandhi sentenced to two years; Criticizing Modi is expensive

मोदींना त्यांच्या आडनावावरुन डिवचने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना चांगलेच महागात पडले आहे. सुरत कोर्टाने राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांना मानहानी प्रकरणात दोषी ठरवले असून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. अगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींसाठी हा मोठा झटका असल्याचे सांगितले जात आहे.

राज्याचे मुख्यमंत्री ‘मिंध्ये’ तर उपमुख्यमंत्री पदी ‘होयबा अंधभक्त’; ठाकरे गटाकडून सरकारवर टीकास्त्र!

राहुल गांधी यांनी एका सभेदरम्यान मोदी या आडनावावरून टिपण्णी केली होती. त्यामुळे राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी कोर्टाने आता निकाल दिला असून राहूल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे याप्रकरणी राहुल गांधी यांना जामीन देखील मंजूर झाला आहे.

मोठी बातमी! एमसी स्टॅनवर भर गर्दीत पुन्हा एकदा हल्ला; पाहा Video

2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कर्नाटक येथे राहुल गांधी यांची मोदी ( Modi) आडनावावरून जीभ घसरली होती. यावेळी भाजपचे आमदार पुर्नेश मोदी यांनी भावंदी अंतर्गत मानहानीचा दावा दाखल केला होता. याबाबत आज सुरत कोर्टात निकाल होता. यासाठी राहुल गांधी सकाळीच दिल्लीहून विमानाने सुरतला आले होते.

मोठी बातमी! एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला आमदार खासदारांसोबत आयोध्या दौऱ्यावर जाणार; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Spread the love
Exit mobile version