
सध्या राखी सावंत सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. मागच्या काही दिवसापूर्वी राखी सावंतने आदिल खानवर (Adil Khan) गंभीर आरोप केले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात असतानाच आदिलचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर सुरू असल्याचं राखी सावंत (Rakhi Sawant) म्हणाली आहे. दरम्यान राखीने आदिल खान विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. आता राखीच्या तक्रारीची दखल मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी घेतली असून आदिलला ताब्यात घेतलं आहे.
धनुष्यबाण व शिवसेनेबाबत निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय!
आज आदिलला कोर्टात हजर करण्यात आले आहे. नुकतंच आदिल दुर्रानीचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. viralbhayani या इंस्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहताच आपल्या लक्षात येते की, राखीचा पती आदिल खान दुर्रानीला पोलिसांनी कोर्टात हजर केलं आहे.
ब्रेकिंग! राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीला अंधेरी कोर्टात केलं हजर
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, आदिल खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आदीलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आदिलचा चेहरा दिसत नाही. काळ्या कपड्याने त्याचा संपूर्ण चेहरा झाकलेला आहे. त्याचबरोबर त्याच्या हातामध्ये हातकडी देखील दिसत आहे.
देवेंद्र फडणवीसांनी घेतली सूत्रे हातात; कसबा चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी