मागील काहीदिवसापासून पुण्यात कसबा ( Kasba Assembly Elections) पोटनिवडणुकीचे वारे वाहत आहे. उमेदवार जाहीर केल्यानंतर झालेली नाराजी, नंतर दणक्यात झालेला प्रचार आणि शेवटी आचारसंहिता भंग झाल्याचे आरोप यामुळे ही निवडणूक प्रचंड गाजली. आता कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली असून या मतमोजणीमध्ये मविआचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
“माझाच विजय होणार”, निकाल लागण्याच्या काही तासापूर्वीच रवींद्र धंगेकर यांचा मोठा दावा
या निवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते तर हेमंत रासने पिछाडीवर होते. धंगेकरांच्या विजयामुळे गेल्या २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असलेलाा हा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे. रवींद्र धंगेकरांनी भाजपाच्या हेमंत रासनेंचा तब्बल ११ हजार ०४० मतांनी पराभव केल्याचे दिसत आहे.
भाजपच्या हातातून कसबा निसटणार? रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांच्यात कोण आघाडीवर? वाचा एका क्लीकवर
रवींद्र धंगेकर याच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळ केल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर कार्यकर्ते मोठमोठ्याने घोषणा देखील देत आहेत.
सहाव्या फेरीत अभिजीत बिचुकलेंना मिळाली ‘इतकी’ मत; आकडा पाहून व्हाल थक्क