MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) MPSC च्या विद्यार्थ्यांची मागणी मान्य करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्विट करत माहिती दिली आहे.
भावी महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळेंचे बॅनर झळकळे
“राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.” अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्विट करत दिली आहे.
अभिनेत्री रवीना टंडनवर आली फरशी पुसायची वेळ; समोर आला धक्कदायक व्हिडीओ
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) February 23, 2023
मागच्या काही दिवसांपासून MPSC विद्यार्थी आंदोलन करत होते. अखेर विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला यश आले असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Facebook: फेसबुकच्या ब्ल्यू टिकसाठी मोजावे लागणार आता ‘इतके’ रुपये!