
महाराष्ट्राच्या सत्तांसंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी (Supreme Court hearing on power struggles in Maharashtra) चालू आहे. यापार्श्वभूमीवर शिंदे गट आणि शिवसेनेच्या (Shivsena) याचिकांची यादी देखील करण्यात आली आहे. मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या विषयावर सर्वोच्च न्यायालय नेमका काय निर्णय घेईल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टातील ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. मात्र तरीदेखील या प्रकरणामध्ये कोणताही निकाल न देता सर्वोच्च न्यायालयानं याबाबत निकाल राखून ठेवला आहे.
या प्रकरणाची सुनावणी नबाम रेबिया प्रकरणानुसार होणार का? आणि हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार का? याबाबत निकाल राखून ठेवला गेला आहे. सुप्रीम कोर्टाने हा निकाल राखून ठेवला आहे त्याचबरोबर पुढील तारीख देखील राखून ठेवली आहे.
धक्कादायक! पगार न झाल्यामुळे एसटी चालकाने आत्महत्या करत संपवले आयुष्य
दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी बंडखोरी करून शिवसेना सोडली. यामुळे राज्यात राजकीय भूकंप आला होता. यानंतर शिंदेंनी भाजपच्या मदतीने व 40 बंडखोर आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. परंतु, हे सरकार असंविधानिक आहे. असे म्हणत शिवसेनेच्या ठाकरे गटाने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
ठरलं! शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ‘या’ तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा १३वा हप्ता