आत्ताची सर्वात मोठी बातमी! धनुष्यबाण व शिवसेना कुणाची? सुनावणी संपली मात्र प्रश्न अजूनही अनुत्तरितच!

Biggest news ever! Whose Dhanushyaban and Shiv Sena? The hearing is over but the question is still unanswered!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यापासून शिवसेनेचे ठाकरे व शिंदे असे दोन गट पडले. या दोन्ही गटांमध्ये शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण कुणाचा ? यावरून वाद सुरू आहेत. याबाबत आज निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होती. मागील अनेक दिवसांपासून रखडलेला हा निर्णय किमान आजतरी होईल म्हणून या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र आजही शिवसेना व धनुष्यबाण नेमका कुणाचा ? यावर निर्णय झाला नसून याबाबतची सुनावणी पुढे ढकलली गेली आहे.

ब्रेकिंग! पक्षप्रमुखपद वाचविण्यासाठी ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे केल्या ‘या’ दोन मागण्या

सोमवारी 23 जानेवारी रोजी शिंदे व ठाकरे गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. या दोन्ही गटांकडून लेखी उत्तरं मिळाल्यानंतर निवडणूक आयोग पुढील कार्यवाही करणार आहे. दरम्यान यावेळी ठाकरे आणि शिंदे या गटाच्या वकिलांमध्ये शाब्दिक चकमक झाली आहे.

ठाकरे गटच खरी शिवसेना; निवडणूक आयोगाच्या सुनावणी दरम्यान कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

दोन्ही गटातील वकिलांनी आपल्या गटाकडून युक्तिवाद केले असून ठाकरे गटाचे देवदत्त कामत आणि शिंदे गटाचे महेश जेठमलानी यांच्यात शाब्दिक चकमक सुद्धा झाली. यावेळी आयोगाला मध्यस्थी करावी लागली होती. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत येत्या 23 जानेवारीला संपणार असल्याने आजची सुनावणी अतिशय महत्त्वाची होती. मात्र निवडणूक आयोगाने आज देखील शिवसेना व धनुष्यबणाचा प्रश्न अनुत्तरितच ठेवला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मेगा भरती; तब्बल 8,169 पदासाठी निघाली जाहिरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *