राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) पक्षाच्या सात आमदारांसह नॉट रिचेबेल आहेत . यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार हे पक्षाच्या सात आमदारांसह नॉट रिचेबेल असल्याचे अनेकांनी ट्विटही केले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मोठी बातमी! पुण्यामध्ये लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपची ‘ही’ तीन नावं आली समोर
अजित पवार कालपासून नॉटरिचेबल आहेत. त्यांनी काल शुक्रवारी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले, त्यानंतर त्यांनी त्यांचा कॅनव्हॉय आणि स्टाफ सोडला आणि ते खासगी गाडीतून रवाना झाले आहेत. त्यामुळे ते कोठे आहेत याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
गौतमी आली, मात्र झालं असं की कार्यक्रमच रद्द करावा लागला; पाहा नेमकं काय आहे कारण?
यामध्येच आता अंजली दमानिया यांनी एक सूचक ट्विट केले आहे. ट्विट करत अंजली दमानिया यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा हात मिळवल्याचा एक फोटो शेअर केला आहे. आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘किळसवाणी राजकारण, मी पुन्हा येईन’ असे ट्विट केले आहे. सध्या हे ट्विट चर्चेत असून या ट्विटमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
दिल्लीत अग्नितांडव! प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग
किळसवाणी राजकारण
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 7, 2023
मी पुन्हा येईन pic.twitter.com/mGY1k2720i