Eknath Shinde । लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. यंदाची निवडणूक खूप अटीतटीची असणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खूप मोठा धक्का बसला आहे. याचा पक्षाला आगामी निवडणुकीत परिणाम पाहायला मिळेल. (Latest marathi news)
Sharad Pawar । शरद पवार यांची मोठी खेळी; अजित पवार यांना धक्का बसणार?
महायुतीत अजूनही जागावाटपाच्या मुद्द्यावर तिढा सुटला नाही. महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना शिंदे गटात लोकसभा तिकिटावरून वाद उफाळून आला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांच्याविरोधात पक्षातच नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे. या नाराजीमुळे शिंदे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. (Shirdi Politics)
Bjp । लोकसभेआधी मोठा राजकीय भूकंप! भाजपच्या बड्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा
सदाशिव लोखंडे यांनी मतदारसंघात कोणतेही ठोस कामे केली नाहीत. पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं नसल्याने आम्ही जनतेला काय उत्तर द्यायचं, असा सवाल या पदाधिकाऱ्यांनी विचारला आहे. आम्हाला मागील १० वर्षात कोणतंही काम न करणारा खासदार पुन्हा नको, अशी टोकाची भुमिका या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतली आहे.