मान्सून ( Monsoon ) हा लांबला असला तरी देखील वळिवाचा पाऊस ( Fall rain ) हा अनेक भागांमध्ये होत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात पावसाचा जोर हा दोन-तीन दिवस कायम राहील. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.
Sonu Sood । ओडिशा अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सोनू सूदने पुढे केला मदतीचा हात!
पावसासह जोरदार वादळी वाऱ्याचा अंदाज सांगितला आहे. मराठवाड्यामध्ये वळिवाच्या पावसाचा अंदाज सांगितला असला तरी काही भागांमध्ये तापमान वाढवण्याची शक्यता सांगितली आहे. उद्या आणि परवा काही ठिकाणी तापमान वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. अरबी समुद्रामध्ये ( Arabian Sea ) चक्रीवादळाची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून वाढणार आहे. परंतु हा मान्सून कधी पडेल याचा अंदाज नाही. सध्या महाराष्ट्र मध्ये पडणारा पाऊस वळीवाचा पाऊस आहे.
बिबट्या घरात घुसला, शिकारही सापडली नाही मग त्याने पळवली ‘ही’ वस्तू; व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
शेतकऱ्यांनी खरीपासाठी शेतीची मशागत सुरू केल्याने शेतकऱ्यांना मान्सूनचे वेध लागले आहे. परंतु पीक पेरणीच्या काळात खतांचा काळाबाजार करून नफेखोरी करणाऱ्यांना रोखण्यासाठी भरारी पथकं ( Bharari squad ) यासाठी सज्ज आहे. बियाणे आणि खतांचा काळाबाजर केल्यास त्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. राज्यामध्ये लवकरच खत आणि बियाण्यांच्या विक्रीला सुरुवात केली जाईल.
धक्कादायक घटना! खेळता खेळता तब्बल ३०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडली चिमुरडी, मग त्यानंतर…