मान्सून संदर्भात समोर आली सर्वात मोठी अपडेट! हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती

Biggest update regarding monsoon! Important information given by Meteorological Department

मान्सून संदर्भातील एक मोठी अपडेट समोर आली आहे. यावर्षी मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईमध्ये मान्सून (Mumbai Monsoon) ११ ते १२ जून दरम्यान दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वायव्य भारतातील अवकाळी पाऊस ३० मे पर्यंत असणार आहे.

प्रियांका चोप्राने दिग्दर्शकाबाबत केला धक्कादायक खुलासा; म्हणाली…

येत्या दोन दिवसात मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालेले आहे. यासंदर्भातील माहिती भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) दिलेली आहे. बंगालच्या उपसागरात मान्सून दाखल झाल्यापासून तो अंदमान-निकोबार बेटावरच होता. त्यामुळे त्याचा वेगदेखील मंद झाला होता.

Big Breaking | ठाकरे गट पुन्हा एकदा फुटणार! शिंदे गटाच्या मोठ्या नेत्याने केला दावा

सध्याच्या परिस्थितीत नैऋत्य वाऱ्यांना गती नाही त्यामुळे मौसमी वारे दक्षिण अंदमानच्या समुद्रातच रेंगाळत आहे. ७ जूनच्या पुढे मान्सून जलद गतीनं पुढे सरकेल असा अंदाज हवामानाची माहिती देणारी खासगी संस्था स्कायमेट वेदर (Skymet Weather) यांनी वर्तवला आहे.

Gautami Patil | गौतमी पाटील पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात! यावेळी गर्दीमुळे नाही तर ‘या’ गोष्टीमुळे झालाय गेम

यावर्षी मान्सूनचं आगमन चार दिवस उशिराच होणार आहे. असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळेच दरवर्षी १ जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा मान्सून या वर्षी ४ जूनला दाखल होणार आहे. ७ जूनच्या पुढे केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा स्कायमेटने दिला आहे. तर मुंबईमध्ये ११ ते १२ जून दरम्यान पाऊस होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics | “इथून पुढे महाविकास आघाडी पुन्हा कधीच सत्तेत येणार नाही”, ‘या’ बड्या नेत्याने केला मोठा खुलासा

यावर्षीच्या मान्सूनबद्दल स्कायमेट आणि आयएमडीने वेगवेगळा अंदाज वर्तवला आहे. स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार, यंदाच्या वर्षी मान्सून सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. तर भारतीय हवामान विभागाकडून यावर्षी सर्वसाधारण मॉन्सून असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तरेकडे जून पर्यंत उष्ण हवामान राहणार आहे. त्यामुळे पेरणीला देखील उशीर होऊ शकतो.

पत्नीने पतीला कारच्या बोनेटवरून फरफटत नेले, अन्… व्हिडीओ पाहून बसेल धक्का

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *