Bjp । भाजपाला मोठा धक्का! बड्या खासदाराने दिला राजीनामा, करणार कॉंग्रेसमध्ये प्रवेश?

Bjp

Bjp । राज्यात काही दिवसांवर लोकसभेच्या निवडणुका (Loksabha election) येऊन ठेपल्या आहेत. सर्व पक्षांमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून बैठका सुरु आहेत. तर काहीजण तिकीट न मिळाल्याने दुसऱ्या पक्षात जाणे पसंत करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला (BJP) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण आणखी एक नेता पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहे. (Latest marathi news)

Sharad Pawar । रोहित पवारांच्या ईडी कारवाईवरून शरद पवार कडाडले, केंद्राला आरसा दाखवत घेतला खरपूस समाचार

हिसारमधील भाजप खासदार ब्रिजेंद्र सिंह (Brijendra Singh) यांनी राजीनामा दिला आहे. “राजकीय मजबुरीमुळे मी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून मला हिसारच्या लोकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल पक्षाध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda), पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) यांचे आभार मानतो,” अशा आशयाची पोस्ट ब्रिजेंद्र सिंह यांनी सोशल मीडियावर केली आहे.

Rinku Rajguru । आर्चीने सांगितला ‘तो’ धक्कादायक अनुभव; म्हणाली, “तो सारखा घरी यायचा आणि एकदा…”

आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजपने हरियाणामध्ये जेजेपीसोबत युती केली आहे. पण या ठिकाणी जागावाटपाबाबत अजूनही कोणतीही घोषणा केली नाही. पण आगामी निवडणुकीत ब्रिजेंद्र सिंह यांना आपले तिकीट कापण्याची भीती आहे, त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. पण ब्रिजेंद्र सिंह यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

Nilesh Lanke । अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का! आमदार निलेश लंके करणार शरद पवार गटात प्रवेश

Spread the love