Biopic On Manoj Jarange । सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या आयुष्यावर येणार चित्रपट; शूटिंगची तारीखही झाली फिक्स

Biopic On Manoj Jarange

Biopic On Manoj Jarange । सध्या राज्यभर मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणाच्या उपोषणाला जालन्यामध्ये बसलेले मनोज जरांगे चर्चेत आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांची आहे. राज्यातील अनेक मराठा समाजाने त्यांना साथ दिली असून अनेक जण त्यांच्यासोबत असल्याचे आश्वासन देत आहेत. राज्याच्या ठिकठिकाणी त्या संदर्भात आंदोलने देखील केले जात आहेत. मात्र आता मनोज जरांगे यांच्या जीवनावर लवकरच एक चित्रपट येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यांचा जीवनप्रवास आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. (Biopic On Manoj Jarange)

Mumbai Rain । मोठी बातमी! मुंबईमध्ये पडतोय मुसळधार पाऊस; वाहतुकीसाठी अंधेरी सबवे बंद

माहितीनुसार, डी गोवर्धन दोलताडे यांनी हा चित्रपट तयार करण्याची घोषणा केली आहे. या संपूर्ण चित्रपटांमध्ये मनोज जरांगे यांचा जीवन प्रवास त्याचबरोबर मराठा आंदोलनामध्ये त्यांची भूमिका काय? आता सध्या सुरू असलेले उपोषण हे या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. “संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील” असे या चित्रपटाचे नाव देखील असणार आहे. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनोज जरांगे पाटील हे स्वतः या चित्रपटांमध्ये भूमिका साकारणार आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती डी गोवर्धन दोलताडे करणार आहेत तर शिवाजी दोलताडे हे दिग्दर्शन करणार आहेत.

Manoj Jarange। मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला हात जोडून केली ‘ही’ विनंती; म्हणाले, तुम्ही जर…”

डिसेंबर 2023 पासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याची देखील घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान मागच्या काही दिवसापासून जालन्यामधील अंतरवाली सराटी या गावांमध्ये मनोज जरांगे यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने राज्याचे वातावरण चांगलेच तापले होते.

नवरा नोकरीनिमित्त बाहेरगावी, महिला तीन दिवस दुसऱ्याच युकवासोबत घरात, गावकऱ्यांना भाऊ आहे म्हणून सांगितलं; मात्र एक दिवस नको त्या अवस्थेत सापडली अन्…

Spread the love