बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone Biperjoy) गुजरातच्या किनारपट्टीवर धडकले आहे. किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत. वादळामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी भारत सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. भारतीय लष्कर, एनडीआरएफसह सर्व यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारचे मंत्री स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
गुजरातच्या (Gujarat) अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे, तसेच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. काही भागांत विजेचे खांबही पडले आहेत. रस्त्यावर देखील पाणीच पाणी झाले आहे.
चक्रीवादळ धडकण्याआधी अंगावर काटा आणणाऱ्या घडामोडी; पाहून व्हाल थक्क
दरम्यान, बिपरजॉय वादळाचा राज्याला तडाखा बसणार असल्याचा अंदाज 6 जून रोजी वर्तवण्यात आला होता. त्यानंतर लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. तरी देखील या वादळाने गुजरातच्या अनेक भागात हाहा:कार उडवला आहे. या वादळामुळे आर्थिकनुकसान देखील मोठ्या प्रमाणात झाले आहे. मात्र, कोणत्याच प्रकारची जीवित हानी झाल्याचं वृत्त नाही.
‘त्या’ एका व्हिडिओने तरुणाचे नशीबच बदलले! २४ वर्षीय सौरभ महिन्याला कमावतोय 80 लाख रुपये