Site icon e लोकहित | Marathi News

Bjp । ब्रेकिंग! भाजपच्या १२ खासदारांनी दिले राजीनामे

Bjp

Bjp | नुकताच पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे . यानंतर आता भाजपने बुधवारी एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. निवडणूक विजयी झालेल्या खासदारांनी संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बुधवारी जवळपास बारा खासदारांनी राजीनामे सादर केले आहेत.

Sunny Deol । मद्यधुंद अवस्थेत सनी देओल मुंबईच्या रस्त्यावर; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला चांगलं यश मिळाल आहे. या ठिकाणी भाजपने सत्ता मिळवली आहे त्याचबरोबर तेलंगणामध्ये भाजपने कामगिरीत सुधारत आठ जागा जिंकल्या. भाजपने या चार राज्यांमध्ये 21 खासदारांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं होतं. राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये प्रत्येकी सात खासदार निवडणुकीच्या आराखड्यात होते. तर छत्तीसगडमध्ये चार आणि तेलेंगणामध्ये तीन खासदारांना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकीट देण्यात आलं होतं.

Gold Silver Rate Today । खरेदीची ‘सुवर्ण’ संधी! सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, पहा नवीनतम दर

ANI वृतसंस्थने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. “विधानसभा निवडणूक लढवलेल्या आणि जिंकलेल्या भाजपच्या सर्व खासदारांनी राजीनामे दिले आहेत. आतापर्यंत एकूण 10 खासदारांनी राजीनामे दिले आहेत. इतर दोन खासदार बाबा बालकनाथ आणि रेणुका सिंह यांचे राजीनामे बाकी आहेत. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी या खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींसोबत केले” असे ट्विट करत खासदारांच्या राजीनाम्याबाबत ANI वृतसंस्थने माहिती दिली आहे.

Viral News । कुत्रा बनण्यासाठी एका व्यक्तीने खर्च केले तब्बल 12 लाख रुपये, कारण वाचून बसेल धक्का

मध्य प्रदेशामधील नरेंद्र सिंग तोमर, राकेश सिंग, उदय प्रताप, प्रल्हाद सिंह पटेल, रीती पाठक तर छत्तीसगडमधील अरुण सावो आणि गोमती साई त्याचबरोबर राजस्थानमधून राज्यवर्धन सिंग राठोड, दिया कुमारी आणि किरोदी लाल मीना हे आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. त्याचबरोबर बाबा बालकनाथ आणि रेणुका सिंह यांचाही राजीनामा दिला जाणार आहे.

Cyclone Michong । मिचॉन्ग गेला पण प्रभाव कायम, 17 मृत्यू, वीज गायब, पाणी साचले, चेन्नईची परिस्थिती अजूनही भयानक

Spread the love
Exit mobile version